सातारा : धनीच्या बागेलगतच्या असलेला मोठा ओढा हा गेल्या अनेक वर्षापासून तुंबलेला आहे. या ओढ्यात झाडे झुडपे व मातीचे ढिगारे साचलेले आहेत. तसेच वृक्षांच्या मोठमोठ्या फांद्या या ओढ्यात पडलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या पाण्याचा प्रवाह या ठिकाणी थांबलेला आहे. पाण्याचा प्रवाह थांबल्याने त्या ठिकाणी पाणी दूषित झाले आहे. त्यात रासायनिक द्रव्यांची भर पडली आहे. त्यामुळे या ओढ्यात जीव जंतूचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला. यामुळे शिवम कॉलनी गडकर आळी येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पावसाळ्यापूर्वी सातारा शहरातील ओढे नाले स्वच्छता मोहीम सातारा नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने केली होती. अनेक भागातील ओढे नाले स्वच्छता करून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल नगरपालिकेने टाकलेले होते. परंतु धनीच्या बागेलगतच्या असलेला मोठा ओढा हा गेल्या अनेक वर्षापासून तुंबलेला आहे. या ओढ्यात झाडे झुडपे व मातीचे ढिगारे साचलेले आहेत. तसेच वृक्षांच्या मोठमोठ्या फांद्या या ओढ्यात पडलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या पाण्याचा प्रवाह या ठिकाणी थांबलेला आहे.
पाण्याचा प्रवाह थांबल्याने त्या ठिकाणी पाणी दूषित झाले आहे. त्यात रासायनिक द्रव्यांची भर पडली आहे. त्यामुळे या ओढ्यात जीव जंतूचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला आहे. याबाबत येथील नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाशी वारंवार संपर्क साधला आहे. याबाबत नगरपालिका प्रशासना कडून पाहणी करण्यात आली आहे. अर्थात पावसाळ्यापूर्वी या ओढ्याची स्वच्छता होणे गरजेचे होते.
तुंबलेल्या ओढ्या बाबत या भागातील नगरसेविका भारती किशोर शिंदे या संवेदनशील आहेत. माजी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनीही याबाबत नगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केलेला आहे. आरोग्य सभापती धनंजय जांभळे व त्यांचे अधिकारी यांनीही या ओढ्याची पाहणी केलेली आहे. दूषित झालेल्या या ओढ्यात जीव जंतूचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे त्यांनीही पाठपुरावा केलेला आहे परंतु अद्याप या ओढ्याची स्वच्छता न झाल्यामुळे परिसरातील नागरिक चिंतेत आहेत.
श्रीरंग काटेकर सातारा