सातारा : हॉटेलमध्ये दारु सेवन प्रकरणी हॉटेल मालकासह दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यवतेश्वर घाटातील हॉटेल सत्यम शिवम येथे एकजण दारु पिवून आढळल्याने सातारा तालुका पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत राजेंद्र मस्कर (वय 32, रा. संभाजीनगर, सातारा) व राहूल बाळासाहेब फडतरे (वय 32, रा. सांबरवाडी ता.सातारा) अशी दोघांची नावे आहेत. यातील राहूल फडतरे हा हॉटेल चालक असून त्यांच्या हॉटेलमध्ये अनिकेत मस्कर हा दारु पिलेला पोलिसांना आढळला.