पुणे : शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आज अंदमानमध्ये मान्सून दाखल असून मागच्या वर्षी पेक्षा ६ दिवस अगोदरच अंदमानमध्ये मान्सून दाखल झाला असल्याची माहिती हवामान विभागाचे प्रमुख डॉ. एस. डी.सानप यांनी दिली.
याबाबत हवामान विभागाचे प्रमुख डॉ. सानप म्हणाले की, आज मान्सून अंदमानमध्ये दाखल झाला आहे. गेल्या २४ ते ४८ तासांपासून अंदमान मध्ये पाऊस पडताना पहायला मिळत आहे. मान्सूनचे वारे सक्रिय झाल्यामुळे मान्सून अंदमान मध्ये दाखल झाला असून केरळ मध्ये येत्या २६ जून पर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. त्यानंतर मान्सून ६ जूनपर्यंत कोकण किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पहिल्या टप्प्यातील अंदाजानुसार सरासरीच्या ९२ टक्के इतका यंदा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावर्षी एल निनो' सक्रिय होत असल्यामुळे पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा ८ टक्क्यांनी कमी राहू शकते असेही डॉ. सानप यावेळी म्हणाले.