अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी दोनजणांवर कारवाई

by Team Satara Today | published on : 23 May 2025


सातारा : बेकायदा दारु विक्री केल्याप्रकरणी दोनजणांवर कारवाई करण्यात आली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अंगापूर ता.सातारा येथे दादा लक्ष्मण मोरे (वय 44, रा. चिंचणी ता.सातारा) याच्यावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 910 रुपये किंमतीच्या 26 बाटल्या जप्त केल्या आहेत. 

दुसरी कारवाई अजंठा चौक येथे महिलेवर करण्यात आली आहे. पोलिसांनी महिलेकडून 490 रुपये किंमतीच्या 14 दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अवैधरित्या जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा
पुढील बातमी
गळफास घेवून एकाची आत्महत्या

संबंधित बातम्या