12:46pm | Sep 25, 2024 |
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी (दि.26) पुणे दौऱ्यावर येत आहेत. या निमित्ताने होणाऱ्या सभेवर पावसाचे सावट आले आहे. स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांची सभा घेतली जाणार आहे. ही सभा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शहर भाजपकडून प्रयत्न सुरु असून, महापालिका प्रशासनालाही सतर्क राहावे लागणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पाच्या सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या मार्गाचे उद्घाटन आणि स्वारगेट ते कात्रज या मार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते गुरुवारी होत आहे. यानंतर स. प. महाविद्यालय मैदानावर पंतप्रधान मोदी यांची सभा होत आहे. या सभेवर आता पावसाचे सावट आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली. तसेच बुधवारी पुणे आणि परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
दरम्यान, या सभेच्या ठिकाणी मंडप उभारण्याचे काम सुरु आहे. पावसामुळे मैदानात चिखल निर्माण झाला आहे. तसेच स्वारगेट, सारसबाग, स. प. महाविद्यालयाच्या परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम महापालिकेने हाती घेतले असले तरी, पावसामुळे ते काम दर्जेदार होईल का ? याविषयी शंका निर्माण झाली आहे.
या कार्यक्रमादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत. महायुती आघाडीच्या ताकदीचे प्रदर्शन म्हणून याकडे पाहिले जात आहे. या जाहीरसभेकडे आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात म्हणून पाहिले जात आहे.
पंतप्रधानांच्या दौऱ्यातील सुरक्षा लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात दोन दिवस पॅराग्लायडिंग, हॉट एअर बलून सफारी, ड्रोनचा वापर आणि मायक्रोलाइट यांसारख्या अवकाश उड्डाणांवर बंदी घातली आहे. कार्यक्रमादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे.
परळीतील घरफोडीच्या गुन्ह्याची केवळ बारा तासात उकल |
शाहूनगर येथे सुमारे लाखाची घरफोडी |
अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर पोक्सो दाखल |
कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांची होणार जगप्रसिद्ध कंदी पेढ्याने तुला |
आदित्यची तळमावले, साईकडेत मिरवणूक |
कराडात सोळा लाखांची ऑनलाईन फसवणूक |
कोरेगांव तालुक्यात कुणबी-मराठा आढळलेल्या नोंदीची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध |
गव्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू |
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
कराडात सोळा लाखांची ऑनलाईन फसवणूक |
कोरेगांव तालुक्यात कुणबी-मराठा आढळलेल्या नोंदीची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध |
गव्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू |
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |