85 व्या औंध संगीत महोत्सवाचे शनिवारी उद्घाटन; उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रमुख उपस्थिती

by Team Satara Today | published on : 09 October 2025


सातारा  : शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानच्या वतीने गेले 85 वर्ष सुरू असलेल्या औंध संगीत महोत्सव 2025 चे उद्घाटन शनिवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी सकाळी पावणे नऊ वाजता आमच्या राणी गायत्री देवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते होणार आहे याची माहिती ट्रस्टच्या विश्वस्त अपूर्वा गोखले आणि पल्लवी जोशी यांनी दिली. 

सायंकाळी ४ वाजता रियाज 2025 या स्मरणिकेचे प्रकाशन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रावण हर्डीकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी ग्रामविकास विभागाचे प्रशासक आय.  ए.  शेख, साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि औंध ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी सी. एम. काजी हे उपस्थित राहणार आहेत.

महोत्सवाच्या सकाळी पहिल्या सत्रांमध्ये अपूर्वा गोखले पल्लवी जोशी यांचे सहगायन, अभिषेक बोरकर यांचे सुरुवात वादन, राजेंद्र अंतरकर यांचे तबला वादन, अमिता गोखले यांचे गायन होणार आहे. दुपारच्या अडीचच्या सत्रात प्राजक्ता मराठे यांचे गायन आणि रियाज मंडीका प्रकाशन सोहळा होणार आहे.  त्यानंतर एकच संवादिनी वादन सुधीर नायक करणार असून पंडित अरुण कशाळकर हे गाणं सेवा प्रस्तुत करणार आहे अनन्या गोवित्रीकर यांचे कथक नृत्य सादर केले जाणार आहे.  .

रात्री दहाच्या 17 मध्ये पंडित उल्हास कषाळकर यांचे गायन तबलावादक सुरेश तळवळकर आणि सुधीर नायक यांची संवादिनीवरसाथ आहे .सायंकाळी पार्थ भूमकर आणि रोहित खवले यांची पखवाज जुगलबंदी तर जयतीर्थ मेथुंडी यांचे गायन होणार आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
झेडपी, पंचायत समिती आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर ; जिल्ह्यात १३ रोजी विशेष सभा : जिल्हाधिकारी संतोष पाटील
पुढील बातमी
साताऱ्यात युवकाला लोखंडी रॉडने मारहाण; खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा

संबंधित बातम्या