कराड : कापील तालुका कराड येथील बोगस मतदार यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. व यास जबाबदार असणार्या निवडणूक निर्णय अधिकारी यांची चौकशी करावी. या मागणीसाठी 14 ऑगस्ट पासून तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसलेले कापील ग्रामपंचायतचे माजी सदस्य व सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांच्या बेमुदत उपोषणास राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेच्या वतीने तहसीलदार कल्पना ढवळे यांना निवेदन देऊन गणेश पवार यांना पाठिंबा देण्यात आला.
निवेदनात म्हटले आहे की, बोगस व दुबार मतदार संदर्भात गेल्या सहा दिवसांपासून गणेश पवार यांचे बेमुदत आमरण उपोषण सुरु असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असेल तर राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेच्या स्टाईलने जन आंदोलन उभे करु असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी संघटनेचे कराड तालुका अध्यक्ष सचिन भिसे, तालुका मार्गदर्शक राकेश पवार, कराड शहर अध्यक्ष विकी शहा, उपाध्यक्ष पंकज मगर, तालुका कार्याध्यक्ष सागर लादे, सामाजिक कार्यकर्ते साजिद मुल्ला, शाखाप्रमुख सिद्धार्थ सागरे यांच्या सह्या आहेत.