सातारा : कंपनीत नोकरी करत असताना विश्वासाचा गैरफायदा घेत सुमारे २० लाख ५१ हजार ७९० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका कर्मचाऱ्यावर शहर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कंपनी मालक सचिन यशवंत शिंदे (वय ४४, रा. यश प्लॉट क्र. १३, शिवाजी हाऊसिंग सोसायटी, सदरबाजार, सातारा) हे प्रिसाईज कंट्रोल या कंपनीचे मालक आहेत. त्यांची कंपनी एन-४७, अॅडिशनल एमआयडीसी तसेच डब्ल्यू-३०, जुनी एमआयडीसी, सातारा येथे कार्यरत आहे.
आरोपी योगेश अशोक भोसले (रा. सातारा) हा कंपनीत नोकरीस असताना त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाचा फायदा घेत ऑक्टोबर २०२४ ते दि. १८ मे २०२६ या कालावधीत एकूण २० लाख ५१ हजार ७९० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाणे येथे आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जायपत्रे करीत आहेत.