04:43pm | Dec 12, 2024 |
लिंबूमध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. वजन कमी करण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. त्याचे सेवन त्वचा आणि केसांसाठी देखील चांगले मानले जाते. म्हणूनच बरेच लोक सकाळी सर्वात आधी लिंबू पाणी पितात.
लिंबू पाणी कधी पिऊ नये? सकाळी रिकाम्या पोटी लिंबाचा रस पिण्याची सवय नेहमीच चांगली नसते. कारण यामुळे यकृत देखील खराब होऊ शकते. डॉक्टर सलीम झैदी यांनी सांगितले की, अर्थातच रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिणे ही आरोग्यदायी सवय आहे. पण ते सर्वांसाठी चांगले ठरेलच असं नाही.
लिंबातील पोषक तत्व
लिंबामध्ये अनेक पोषक तत्व आढळतात. ते आपण आधी जाणून घेऊया. लिंबामध्ये कॅलरीज 18, प्रथिने 0.6 ग्रॅम, कार्ब्स 5 ग्रॅम, फायबर 2 ग्रॅम, एकूण साखर 1.5 ग्रॅम, कॅल्शियम 15 मिलीग्राम, मॅग्नेशियम 5 मिग्रॅ, फॉस्फरस 9 मिग्रॅ, सोडियम 1 मिग्रॅ, व्हिटॅमिन सी 31 मिग्रॅ, फोलेट 6, मायक्रोग्राम (एमसीजी), कॅरोटीन, बीटा 2 एमसीजी व्हिटॅमिन ए 13 मायक्रोग्राम इतके पोषक तत्व आढळते
कोणासाठी लिंबू पाणी ठरेल विष
कोणत्या रुग्णांसाठी लिंबू ठरते विष
जर कोणाला आम्लपित्त, यकृत कमजोरी अर्थात लिव्हरमधील समस्या असेल किंवा दातांना मुंग्या येत असतील तर त्याने रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिऊ नये. कारण त्याच्या अति प्रमाणात सायट्रिक अॅसिड आरोग्य बिघडवू शकते. त्यामुळे दातांचा इनॅमलही हळूहळू खराब होऊ शकतो. तुम्हाला जर यापैकी कोणतेही आजार असतील अथवा त्रास होत असेल तर लिंबू पाणी रिकाम्या पोटी पिणं हे तुमच्यासाठी विषापेक्षा कमी ठरणार नाही हे लक्षात घ्या
लिव्हर खराब होण्याची शक्यता
लिंबाच्या सेवनामुळे लिव्हर होईल खराब
डॉक्टरांनी सांगितले की लिंबातील आम्ल हे लिव्हरचे फंक्शन वाढवते, जे सामान्य व्यक्तीसाठी चांगले आहे. पण ज्या व्यक्तींचे लिव्हर आधीच कमकुवत किंवा आजारी असेल तर त्यावर अनावश्यक दबाव वाढतो. त्यामुळे पचन आणि यकृत डिटॉक्स प्रणाली दोन्ही कमकुवत होऊ शकते. याचा परिणाम लिव्हर लवकर खराब होण्यावर, सडण्यावर वा डॅमेज होण्यावर होऊ शकतो. त्यामुळे लिव्हरचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी लिंबाचा सहसा उपाशीपोटी उपयोग करू नये
काय प्यावे
जर तुम्हाला ॲसिडिटी किंवा संवेदनशील दातांची समस्या असेल अथवा तुमचे लिव्हर खराब असेल तर लिंबू पाण्याऐवजी तुम्ही रिकाम्या पोटी दुसरा उपाय करून पहा. रात्रभर भिजवलेले बेदाण्याचे पाणी प्या. हे सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने यकृत डिटॉक्स होते आणि ॲसिडिटीला प्रतिबंध होतो. तसंच यामुळे तुम्हाला आम्लपित्ताचा त्रासही होत नाही
कोणी लिंबू पाणी पिऊ नये?
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.
कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांची होणार जगप्रसिद्ध कंदी पेढ्याने तुला |
आदित्यची तळमावले, साईकडेत मिरवणूक |
कराडात सोळा लाखांची ऑनलाईन फसवणूक |
कोरेगांव तालुक्यात कुणबी-मराठा आढळलेल्या नोंदीची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध |
गव्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू |
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी |
पाण्याच्या मोटरची चोरी |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |