पीठ मळल्यानंतर किती तासात खराब होतं?

by Team Satara Today | published on : 12 September 2025


प्रत्येक घरात चपाती किंवा रोटी बनवण्यासाठी पीठ हे मळलंच जातं. पण कधी कधी वेळेअभावीच काही महिला पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवतात. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की हे पीठ किती दिवस ताजे राहू शकते? किंवा चुकीच्या पद्धतीने साठवले तर ते किती लवकर खराब होऊ शकते? मग ते मळून ठेवलेलं पीठ असो किंवा कोरडे. पीठाचा ताजेपणा केवळ अन्नाच्या चवीवरच परिणाम करत नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्यावर देखील परिणाम करतो. त्यामुळे जाणून घेऊयात की पीठ किती तासात खराब होतं?

पीठ कसं साठवायचं?

पीठ हा ओलावा आणि उष्णतेचा सर्वात मोठा शत्रू आहे. जर तुम्ही ते जास्त वेळ भांड्यात न झाकता तसंच ठेवलं किंवा प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलं तर त्यावर बुरशी, कीटक येऊ शकतात. त्यामुळे पीठ नेहमी हवाबंद डब्यात आणि थंड, तसेच कोरड्या जागी ठेवावं.

पीठ खराब होण्यास किती वेळ लागतो?

सामान्य गव्हाचे पीठ : उघडे ठेवल्यास 1 ते 2 आठवड्यात खराब होऊ लागते.

मिश्र पीठ (मैदा + गहू + कोंडा)  : 2 ते 3 आठवडे ताजे राहू शकते.

मळलेलं पीठ : मळलेलं पीठ हे फ्रिजमध्ये ठेवलं तर ते 5 ते 6 तासांच्या आत वापरणे योग्य. तर मळल्यानंतर पीठ खोलीच्या तापमानात 2 ते 3 तासच सुरक्षित राहू शकते.

बॅक्टेरिया वेगाने पसरतात: उन्हाळा आणि पावसाळ्यात त्याचे शेल्फ लाइफ आणखी कमी होते, कारण ओलावा आणि बॅक्टेरिया वेगाने पसरतात.

खराब पीठ कसे ओळखावे? 

फक्त रंग पाहून पीठ खराब आहे की नाही हे ठरवता येत नाही. त्याची ही लक्षणे ओळखा, जसं की…

विचित्र किंवा आंबट वास. लहान कीटक किंवा बुरशी दिसणे. चवीत बदल. पीठ चिकट किंवा गुठळ्यासारखे दिसणे

जर यापैकी कोणतीही चिन्हे दिसली तर पीठ ताबडतोब फेकून द्या

1.पीठ जास्त वेळ ताजे कसे ठेवण्याचे

2.जुने पीठ संपल्याशिवाय किंवा संपत आल्याशिवाय नवीन पीठ खरेदी करून नका अन्यथा कोरडे पीठही खराब होऊ शकते.

3.ओल्या हातांनी किंवा भांड्यांनी कधीही पीठाला स्पर्श करू नका.

4.उन्हाळ्यात पीठ फ्रिजमध्ये किंवा थंड ठिकाणी ठेवा.

5.तुम्हाला शक्य असल्यास किंवा तुम्हाला चव आवडत असल्यास तुम्ही पीठ हलके भाजूनही घेऊ शकता

खराब झालेल्या पीठाची रोटी किंवा चपाती खाल्ल्याने आरोग्यावर होणारे परिणाम

खराब पिठापासून बनवलेल्या रोट्या किंवा पराठे खाल्ल्याने पोटदुखी, उलट्या, जुलाब आणि अन्नातून विषबाधा यासारख्या समस्या उद्भवू शकतात. मुले, वृद्ध आणि प्रतिकारशक्ती कमी असलेल्या लोकांना याचा जास्त त्रास होऊ शकतो. म्हणूनच पिठाच्या ताजेपणाबद्दल निष्काळजी राहू नये

मायक्रोवेव्हमध्ये ठेवल्याने काय होते?

काही लोकांना असे वाटते की पीठ मायक्रोवेव्हमध्ये ठेवून त्याचे शेल्फ लाइफ वाढवता येते, परंतु तज्ञांचे म्हणणे आहे की असे केल्याने पीठातील ओलावा आणखी वाढतो, ज्यामुळे ते लवकर खराब होऊ शकते.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा

संबंधित बातम्या