सातारा : सातारा शहर व शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दोन जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापे टाकून दोन जणांवर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिवराज पेट्रोलपंप परिसरात जुगार प्रकरणी अमोल पंढरीनाथ जगताप (वय 43, रा. करंजे पेठ, सातारा) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 790 रुपये व रोख रक्कम जप्त केली आहे.
दुसरी कारवाई यादोगोपाळ पेठेत जयंत बजरंग इनामदार (वय 41, रा.मंगळवार पेठ, सातारा) याच्यावर करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून रोख 720 रुपये व जुगराचे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.