सातारा : सदर बाजार येथील वस्ताद ग्राउंड समोर असलेल्या टपरीच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर शहर पोलिसांनी छापा टाकून एकूण ६७० रुपये किमतीचे जुगाराचे साहित्य आणि रक्कम जप्त केली आहे.पोलीस कॉन्स्टेबल तुषार भोसले यांनी छापा टाकला असून याप्रकरणी मंगलदास शिवदास बाबर (वय ५४ वर्षे, राहणार लक्ष्मी टेकडी सदर बाजार सातारा) याच्या विरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सदरबाजार येथील वस्ताद ग्राऊंडवरील जुगाराच्या अड्डावर छापा
by Team Satara Today | published on : 14 March 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा