सातारा : ट्रक व एसटीच्या झालेल्या अपघात प्रकरणी ट्रक चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मिलींद शालीक कंकाळ (वय 36, रा. मिरज) यांनी शंकर महादेव माने (वय 43, रा. येलदरी ता.जत) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा अपघात 17 जुलै रोजी शेंद्रे ता.सातारा येथे झाला आहे. संशयित चालक ट्रक घेवून जात असताना एसटी पंक्चर झाली असल्याने ती थांबलेली असताना पाठीमागून धडक बसली. अपघातात वाहनांचे नुकसान झाले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.