सदर बझार येथून दुचाकीची चोरी; अज्ञातावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा

by Team Satara Today | published on : 19 October 2026


सातारा : सदर बझार येथून दुचाकीची चोरी केल्याप्रकरणी अज्ञातावर  सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 17 रोजी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास इम्रान सलीम मेमन (रा. सदर बझार, सातारा) यांची घरासमोर पार्क केलेली यामाहा कंपनीची दुचाकी क्र. एमएच 11 एएम 3676 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आरएमसी प्लांट कंपनीमधून 50 हजारांच्या डिझेल चोरीप्रकरणी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल
पुढील बातमी
सातारा शहर व तालुका परिसरातून वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांचे अपहरण

संबंधित बातम्या