फलटण तालुक्यात अवकाळीने ऊस, मका, कांदा, गहू पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान; आ. सचिन पाटील यांनी केली पाहणी; तात्काळ पंचनामे करण्याचा आदेश

by Team Satara Today | published on : 05 April 2026


फलटण : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे फलटण तालुक्यात बाधित झालेल्या क्षेत्राचा आमदार सचिन पाटील आणि युवा नेते अमरसिंह नाईक निंबाळकर यांनी शेतीच्या नुकसानीची पाहणी केली.

फलटण तालुक्यातील तरडगाव, कापडगाव, चांभारवाडी, हिंगणगाव परिसराला शुक्रवारी (दि. 3) दुपारी अवकाळी पावसाने झोडपले. त्यावेळी झालेल्या गारपिटीमुळे ऊस, मका, कांदा, गहू या पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी जनावरांचे गोठे आणि घरांचेही अतोनात नुकसान झाले आहे. 

ही परिस्थिती समजताच आमदार सचिन पाटील आणि अमरसिंह नाईक निंबाळकर यांनी बाधित क्षेत्राचा दौरा करून, नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. या दौर्‍यात आमदार पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांशी संवाद साधून, त्यांना धीर दिला. यावेळी तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, मंडलाधिकारी खाडे, धेंडे आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत आणि पुढील कार्यवाहीसाठी अहवाल शासन दरबारी पाठवावा, असा आदेश आमदार पाटील यांनी दिला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कुमठेतील शेळ्या चोरटे गजाआड करण्यात बोरगाव डीबीला यश; साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत
पुढील बातमी
पालखी महामार्गावर अपघातात काळजचे पती-पत्नी जागीच ठार; महामार्ग की मृत्यूचा सापळा ?

संबंधित बातम्या