खेड परिसरात चेनस्नॅचिंग; महिलेचे मिनीगंठण हिसकावून चोरटे पसार

by Team Satara Today | published on : 12 June 2026


सातारा : खेड परिसरात चेनस्नॅचिंगची घटना घडली असून अज्ञातांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, खेड परिसरात कांता माने या दुचाकीवर बसून घरी जाण्याच्या तयारीत असताना भरधाव दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 14 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनीगंठण हिसकावून नेले. घटनेनंतर पोलिसांनी शोधमोहीम राबविली मात्र आरोपींचा माग काढता आलेला नाही. सातारा शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल असून पोलीस उपनिरीक्षक सावंजी तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
तारळी प्रकल्पाच्या देयकासाठी ठेकेदार आक्रमक; 17 जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा
पुढील बातमी
कुपर कॉलनी, सदरबाजार चौक, पीरवाडी चौक परिसरात अनधिकृत वाढदिवस बॅनरप्रकरणी कारवाई

संबंधित बातम्या