सातारा : कराड शहर व परिसरात वाढती गुन्हेगारी लक्षात घेऊन कराडचे पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर तसेच शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी सकाळी साडेअकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत कोंम्बिंग ऑपरेशन राबवून पाच रेकॉर्डवरील संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली.
यामध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये ९१ कारवाया, मोटार वाहन कायद्यान्वये ४० कारवाया, तर ५ रेकॉर्डवरील संशयितांवर पोलिसांकडून प्रतिबंधक कारवाई करण्यात आली.
या कोंम्बिंग ऑपरेशन मोहिमेत पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर, कराड शहर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांच्यासह कराड शहर पोलीस ठाणे, कराड शहर वाहतुक शाखा व कराड उपविभागीय कार्यालय यांच्याकडील ८ पोलीस अधिकारी व ३० पोलीस कर्मचाऱ्यांनी भाग घेतला.
या मोहिमेअंतर्गत कराड शहर, विद्यानगर, कॉलेज परिसर तसेच ओगलेवाडी, हजारमाची शाळा, कॅफे परीसरामध्ये कोंम्बिंग ऑपरेशन व नाकाबंदी ऑपरेशन करीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये सनी उर्फ गणेश सुरेश शिंदे रा. ओगलेवाडी, ता. कराड यांचेवर पोलिसांनी कारवाई केली. विद्यानगर, कॉलेज परिसर तसेच ओगलेवाडी, हजारमाची शाळा, कॅफे परिसरात ९० कारवाया, मोटार वाहन कायद्यान्वये ४० कारवाया करून २२ हजार ५०० रूपये दंड वसूल करण्यात आला. रेकॉर्डवरील ५ संशयितांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली.
सार्वजनिक वाहतुकीस अडथळा करणार्या वाहनांवर कारवाया करण्यात आल्या. तसेच कराड शहर, विद्यानगर कॉलेज परिसर तसेच ओगलेवाडी, हजारमाची शाळा, कॅफे परीसरामधील गुन्हेगारी मोडुन काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. यादरम्यान कराड पोलीसांचे रेकॉर्डवरील १० माहीतगार गुन्हेगारांना चेक करण्यात आले. त्यांच्या गुन्हेगारी हालचाली पडताळण्यात आल्या. रेकॉर्डवरील संशयित शेखर प्रकाश सुर्यवंशी, संग्राम प्रल्हाद पवार, सनी ऊर्फ गणेश सुनील शिंदे, जमीर मलीक फकीर / शेख, गणेश पप्पु जावीर, अमित हणमंत कदम, राजु गेणु चव्हाण, शितल गोरख काळे, अनिकेत सुनिल खरात, अखिलेश सुरज नलवडे यांना अचानकपणे चेक करुन त्यांच्या गुन्हेगारी हालचाली पडताळण्यात आल्या. तडीपार गुन्हेगारांना चेक करण्यात आले.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील, कराड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे निर्भया व पोलीस अंमलदार कराड शहर पोलीस ठाणेचे सपोनि प्रशांत बधे, गणेश कड, पोउनि. धनाजी देवकर, कृष्णा डिसले, मारुती चव्हाण, राज पवार, भोसले व कराड वाहतुक शाखेचे सपोनि संदिप सुर्यवंशी, पोउनि. विजय भोईटे यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.
कराड शहर परिसरात पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन
रेकॉर्डवरील 5 संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई
by Team Satara Today | published on : 24 August 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा