सातारा : सातारा येथील प्रतिथयश वकील व सातारचे माजी सहाय्यक जिल्हा सरकारी वकील एडवोकेट शामप्रसाद बेगमपुरे (71) यांचे पुणे येथील खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर संगम माहुली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्येष्ठ कन्या देवकी हिने मुखाग्नी दिला.
त्यांच्या निधनाची वार्ता कळताच त्यांच्या मित्र परिवारात व नातेवाईकांमध्ये दुःखाचे वातावरण पसरले. दुपारी त्यांचे पार्थिव शनिवार पेठेतील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आल्यानंतर अंत्यदर्शन घेण्यासाठी विविध क्षेत्रातील स्त्री-पुरुषांनी गर्दी केली होती.
संगम माहुलीला नेण्यापूर्वी पार्थिव काही काळ सातारा जिल्हा न्यायालयाच्या आवारात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
त्यांच्या पश्चात पत्नी वर्षा , विवाहित मुली देवकी व रेणू तसेच जावई , नातवंडे असा परिवार आहे.