सातारा : दुचाकीच्या धडकेत ७२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याप्रकरणी पित्यासह अल्पवयीन पुत्रावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश अशोक पिसाळ ( वय ३७,रा. आकाशवाणी केंद्राजवळ, झोपडपट्टी, सातारा) असे गुन्हा दाखल केलेल्या पित्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तामजाईनगर फाटा,शाहूपुरी येथे दि १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११:४५च्या सुमारास ही घटना घडली आहे. १२ वर्षीय अल्पवयीन युवकाने प्लेजर मोटार सायकल भरधाव चालवून समोरून येणाऱ्या दुचाकी चालक बाळासाहेब बाबुराव गाडे (वय ७२) यांना जोराची धडक दिली. या अपघातात गाडे हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिकांनी त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असताना दि. 6 ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांचे निधन झाले. अपघाताची फिर्याद पोलीस हवालदार संदीप मदने यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिल्याने दिनांक २० मार्च २०२६ रोजी पिता पुत्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस हवालदार गायकवाड करत आहे.