सातारा : महाराष्ट्रातील गडकोट किल्ले आणि ऐतिहासिक स्थळांवर कायम स्वरुपी भगवा झेंडा उभारावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवा झेंडा घेऊन स्वराज्य स्थापन केले आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी ते वाढवलं आणि त्यानंतरच्या काळात मावळ्यांनी अटकेपार भगवा झेंडा फडकवला. असे असताना सुद्धा महाराष्ट्रातील किल्ल्यांवर आणि ऐतिहासिक स्थळांवर भगवा झेंडा दिसत नाही.
काही दिवसांपूर्वी आलेल्या एका व्हिडिओमध्ये अत्यंत वाईट गोष्ट दिसत आहे. महाराष्ट्र मध्येच असलेल्या जंजिरा किल्ल्यावर आणि परिसरात भगवा झेंडा नेण्यासाठी आणि फडकवण्यासाठी मनाई केली जात आहे, हे अत्यंत चुकीचे आहे.
यावेळी भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम, भाजपा सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, सातारा शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, विक्रांत भोसले, नितीन कदम, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विक्रम बोराटे आणि पदाधिकारी उपस्थित होते.