मारहाणीसह विनयभंगप्रकरणी तीन जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा

by Team Satara Today | published on : 26 May 2026


सातारा : मारहाणीसह विनयभंग केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 22 रोजी तक्रारदार महिला या त्यांच्या माहेरी आई-वडिलांना भेटून निघाल्या असता त्यांच्या गाडीला विजयकुमार अंकुश देवगुडे, प्रवीण अंकुश देवगुडे, अंकुश किसन देवगुडे (तिघेही रा. आंबवडे बुद्रुक, ता. सातारा) यांनी गाडी आडवी मारली. याबाबत विचारणा केली असता संबंधितांनी तक्रारदारांच्या वडील, भाऊ यांना मारहाण करून जखमी केले. तसेच त्यांच्या पतीच्या खिशातून जबरदस्तीने सातशे रुपये काढले. त्याचबरोबर तक्रारदारांशी असभ्य वर्तन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार कर्णे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा
पुढील बातमी
प्रत्येक गावाने सौर ऊर्जा निर्मितीकडे पुढाकार घ्यावा - आ. महेश शिंदे, चंचळी येथे ८ मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण

संबंधित बातम्या