मोळाचा ओढा ते रामनगर रस्त्यावर कारने धडक दिल्याने तीनजण गंभीर जखमी; कार चालकाविरुद्ध गुन्हा

by Team Satara Today | published on : 15 July 2026


सातारा : कारने धडक देऊन तीन जणांना जखमी केल्याप्रकरणी कार चालकाविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 14 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कोंडवे गावच्या हद्दीतील मोळाचा ओढा ते रामनगर रस्त्यावर अमीर सलीम शेख (रा. वनवासवाडी कृष्णानगर सातारा) याने त्याच्या ताब्यातील होंडा सिटी कार (क्र. एमएच 02 सीझेड 6004) अविचाराने, बेदरकारपणे, निष्काळजीपणे, भरधाव वेगात चालवून रस्त्याकडेला गाड्या लावून चर्चा करीत असलेले अनिकेत राजेश पवार (रा. शिवाजीनगर, पोस्ट वेचले, ता. सातारा) व त्यांचा मित्र शुभम गोरखनाथ साळुंखे यांना जोरदार धडक देऊन अपघात केला. या अपघातात पवार व साळुंखे गंभीर जखमी झाले असून कारमधील प्रवासी श्रेयस सुधीर भोसले (रा. तामजाईनगर, सातारा) हे सुद्धा जखमी झाले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
निसर्गरम्य कास पठारावर विंटेज गाड्यांचा थरार; खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते याचे उद्घाटन, मोटारसायकलप्रेमींशी साधला संवाद
पुढील बातमी
मुलाच्या वियोगाने आलेल्या नैराश्यातून दाम्पत्याने केले विषारी औषध प्राशन; दोघांचाही मृत्यू

संबंधित बातम्या