सातारा : महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) कार्यालयामार्फत गुरुवार दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १० वाजता अलंकार हॉल, पोलिस करमणुक केंद्र, सातारा येथे जिल्हास्तरीय "रानभाजी महोत्सवाचे" आयोजन केले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या शुभहस्ते होणार आहे.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन उपस्थित असणार आहेत. तरी रानभाज्या, रानफळे खरेदीचा जास्तीत जास्त ग्रांहकानी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा सातारा यांनी केले आहे.