टेम्पो-दुचाकी अपघातात बाप-लेकीचा मृत्यू

नागठाणे येथील घटना; टेम्पो चालकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 08 June 2025


सातारा : पुणे- बेंगलोर महामार्गावर नागठाणे ता. सातारा गावाच्या हद्दीत टेम्पो व दुचाकीच्या भीषण अपघातात बाप लेकीचा मृत्यू झाला. इब्राहिम हसन शेख वय ३८ व मेहक इब्राहिम शेख वय १२ वर्ष रा. जऊळके खु. रेटवडी हडपसर पुणे हे ठार झाले.या प्रकरणी असिफ नयमुद्दीन सयद वय ३० रा.हडपसर पुणे या टेम्पो चालकावर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सायंकाळी ४.३० च्या दरम्यान महामार्गावर नागठाणे येथील पेट्रोल पंपाच्या समोर कराड सातारा लेनवर कराडहुन साताऱ्याच्या दिशेने इब्राहिम शेख हे त्यांच्या मुली सह दुचाकी वरून निघाले होते. या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने त्यांच्या दुचाकीस मागून जोरदार धडक दिली. यावेळी इब्राहिम शेख व मेहक शेख हे रस्त्यावर जखमी अवस्थेत पडले. त्यांना टेम्पोने काही अंतर फरपटत नेले. या घटनेची माहिती मिळताच बोरगाव पोलीस स्टेशनचे अपघात विभागाचे पो.उप निरीक्षक सुधीर भोसले व सहकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी त्वरित अंबुलन्स मधून जखमींना सातारा येथील सिव्हिल रुग्णालयात पाठवले. या जखमींवर उपचार सुरू असताना त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी एकावर गुन्हा

संबंधित बातम्या