सदरबाजार रामकुंड येथे चारचाकीच्या धडकेत एक जण गंभीर जखमी

by Team Satara Today | published on : 18 March 2026


सातारा : सदर बाजार रामकुंड येथे दि. १३ रोजी सायंकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास चारचाकी अपघातात एक जण जखमी झाला आहे. विजय जयवंत आवळे (वय ३५, रा. भीमाबाई आंबेडकर नगर सदर बाजार सातारा) असे जखमीचे नाव आहे. आवळे हे रस्ता ओलांडत असताना त्यांना वाढे फाटा येथून आलेल्या चारचाकी वाहनाने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले आहे. यावेळी चारचाकी चालकाने जखमीला कोणत्याही प्रकारची मदत न करता चारचाकीसह पळून गेला.

त्यांना उपचारासाठी स्थानिकांनी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी अज्ञात चार चाकी वाहनावरील चरकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवलदार खलिफा करत आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पॉवर हाऊससमोर झालेल्या अपघातातील जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
पुढील बातमी
साताऱ्यात 22 मार्च रोजी महाराष्ट्र मंदिरास परिषद; राज्य संघटक संजय जोशी यांची पत्रकार परिषदेत माहिती

संबंधित बातम्या