सातारा : कराडच्या न्यायालयात सर्वांची कोर्टकेस संदर्भातील लगबग सुरु होती. सकाळी पावणेअकरच्या सुमारास केसच्या सुनावणीसाठी आलेल्या एका पक्षकाराला फिट आली. तो मोठ्याने ओरडतच जिल्हा न्यायाधिश यु. एल. जोशी यांच्या दालनाबाहेर पडला. त्याच्या तोंडाला लगेचच फेस आला होता. त्यादरम्यान तेथे एकच धावपळ उडाली. मात्र, न्यायाधीशांसह कर्मचाऱ्यांनी धावपळ करून पक्षकाराला उपचार उपलब्ध करून दिल्याने त्याचे प्राण वाचले आहेत. जिल्हा न्यायाधिश यु. एल. जोशी, अतिरीक्त जिल्हा न्यायाधिश दिलीप पतंगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेने संबंधित पक्षकाराचे जीव वाचवण्यास मदत झाली.
केसच्या सुनावणीसाठी आलेल्या एका पक्षकाराला फिट आली. तो मोठ्याने ओरडतच जिल्हा न्यायाधिश यु. एल. जोशी यांच्या दालनाबाहेर पडला. अचानक आवाज झाल्याने न्यायाधीश सौ. जोशी धावतच दालनाबाहेर आल्या. त्यांच्यासोबत अधिक्षक डी. डी. सामक, सहाय्यक अधिक्षक लांडगे, लघुलेखक मिलींट मोटे हे ही धावत दालनाबाहेर गेले. त्यांनी संबंधिताला फिट येवुन तो पडल्याचे त्यांनी पाहिले. त्यावेळी न्यायाधीश सौ. जोशी यांनी तात्काळ कर्मचाऱ्यांना कांदा आणण्यास सांगतच पोलिसांना कळवण्याबरोबरच ही रुग्णवाहिकेस कळवण्यास सांगितले.
त्यादरम्यान दुसरे जिल्हा न्यायाधीश दिलीप पतंगेही तेथे पोहचले. तेथे पक्षकारांसह वकिलांची मोठी गर्दी जमली होती. यावेळी काहींनी संबंधित पक्षकाराच्या नाकाला कांदा लावुन त्यांना शुध्दीवर आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. काही जणांनी त्यावेळी रुग्णवाहिका बोलवण्यासाठी प्रयत्न केले. न्याय़ाधिशांनी संबंधिताचे जीव वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न उपस्थित सर्वांनीच जवळुन पाहिले. त्यानंतर काही वेळातच तेथे रुग्णवाहिका दाखल झाल््या. त्यातुन संबंधिताला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.
संबंधित पक्षकार हा घाणबी (ता. पाटण) येथील असुन त्याच्यावर खटला दाखल झाला आहे. त्याची सुनावनी येथील अतिक्त जिल्हा सत्र न्यायालयात सुरु आहे. त्यासाठी तो न्यायालयात आला होता.
मात्र, त्याला अचानक फिट आल्याने तो न्यायाधिशांच्या दालनाबाहेर कोसळला. जिल्हा न्यायाधिश यु. एल. जोशी, अतिरीक्त जिल्हा न्यायाधिश दिलीप पतंगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेने संबंधित पक्षकाराचे जीव वाचवण्यास मदत झाली.