किराणा सामान आणण्यासाठी बाहेर पडलेली महिला अद्याप बेपत्ता; पोलिसांकडून महिलेचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू

by Team Satara Today | published on : 05 June 2026


सातारा : घरातून किराणा सामान आणण्यासाठी जात असल्याचे सांगून बाहेर पडलेल्या महिलेचा शोध अद्याप लागलेला नसल्याने सातारा शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता व्यक्तीची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, रजनी पंकज जाधव (वय ३०) या घरातून बाहेर पडल्यानंतर परत आल्या नाहीत. नातेवाईक आणि परिचितांकडे चौकशी करूनही त्यांचा कोणताही मागमूस लागलेला नाही.

याबाबत पती पंकज शंकर जाधव यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून विविध माध्यमांतून महिलेचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असून महिला पोलीस हवालदार पाटील या तपासाची जबाबदारी सांभाळत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विवाहितेवर जबरदस्तीने अत्याचार; मेढा पोलिसांकडून मानेवाडीच्या संशयितास अटक
पुढील बातमी
सातारा बसस्थानक परिसरात रात्री उशिरापर्यंत व्यवसाय; पान सेंटर चालकांवर कारवाई

संबंधित बातम्या