वाई : विरोधकांनी आपल्या तालुक्यातील संस्थांची वाट लावली. सगळी पापे यांनी केली आणि आता त्यांच्या पापाचे भोग मी निस्तरतोय. त्यांनी वाट लावलेल्या संस्था आम्ही दुरुस्त करतोय, असा हल्लाबोल महायुतीचे वाई, खंडाळा व महाबळेश्वर मतदारसंघाचे उमेदवार आ. मकरंद पाटील यांनी केले.
बावधन गटातील अनपटवाडी येथील आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी किसनवीरचे संचालक दिलीप पिसाळ, मदन भोसले, विक्रम वाघ, सरपंच अमृता गोळे, अश्विनी मांढरे, तानाजी कचरे, सतीश कांबळे, पोपट पिसाळ, अनिल अनपट, नितीन मांढरे, वसंत अनपट, अजित पसिाळ, नवनाथ भोसले, संतोष राजेभोसले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
आ. मकरंद पाटील म्हणाले, किसनवीर कारखान्यांवर जप्ती आली होती. 9 बँकांचे कर्ज होते; पण चांगल्या कामाच्या पाठीशी परमेश्वर असतो. 467 कोटी रुपये महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मिळाले. ऊस उत्पादक सभासदांना 3000 दर दिला. स्व. अप्पांनी जी सूतगिरणी उभी केली ती बंद होती. उद्योगपती व व्यापारी आणून ती सूतगिरणी चालू केली. विरोधक म्हणतात कोणती संस्था उभी केली? पापं कुणी केली? फेडतो आहे मी. पूर्वीची मार्केट कमिटीची अवस्था बघा, पूर्ण तोट्यात होती. माझ्याकडे आली आणि यावर्षीचा फायदा 80 लाख रुपये आहे. मी ज्या ज्या संस्था ताब्यात घेतल्या समर्थपणे चालवल्या. ज्या ज्या गावांची मागणी आली त्या त्या गावामधे मी विकासकामे करत असतो. माझ्या तोंडून नाही हा शब्द कधी येत नाय. सर्वांगीण विकासात्मक मतदारसंघ बांधण्याचा मी प्रयत्न केलाय, असेही आ. पाटील म्हणाले. यावेळी नितीन मांढरे यांनी मनोगत व्यक्त केले.
विरोधकांच्या भ्रष्टाचारामुळेच जनतेने संस्था आमच्याकडे सोपवल्या
विरोधक म्हणतात यांच्याच घरात सत्ता असल्याने यांच्याकडेच सर्व संस्था. पण विरोधकांनी या संस्था माझ्या ताब्यात येण्यापूर्वी त्यांची काय अवस्था होती? याचा विचार केला नाही. किसनवीर व खंडाळा हे दोन्ही कारखाने, वाईची सूतगिरणी, वाई बाजार समिती या संस्था पूर्वी तोट्यात होत्या. त्यातील सूतगिरणी व बाजार समिती फायद्यात येवू लागली आहे. विरोधकांनी संस्थेत भ्रष्टाचारी कारभार केल्यानेच जनतेनेच या संस्था आमच्या ताब्यात दिल्या. तुम्ही संस्था सांभाळल्या असत्या तर तुमची पाप निस्तरावी लागली नसती, असा टोलाही आ. पाटील यांनी लगावला.
मराठा महासंघाचा पृथ्वीराज चव्हाण यांना पाठिंबा |
सूज्ञ मतदार 20 तारखेला उद्वेग व्यक्त करतील |
बारामतीच्या सुभेदारीवरून शरद पवारांचा अजितदादांना खोचक टोला |
भाजप उमेदवाराला कराडकरांकडे मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही : शिवराज मोरे |
आ.शशिकांत शिंदे यांच्या हाती राज्याचे सरकार द्यायचे आहे |
देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याचा कराडमध्ये बहुसंख्येने करण्यात आला निषेध |
रामायण, महाभारतातील जीवनमूल्य छत्रपती शिवरायांच्या चरित्रात : गोविंद देवगिरी |
ब्राझीलला असताना त्यांना भुमिपुत्र आठवला नाही का ? : शशिकांत शिंदे |
अर्ज भरला त्याच दिवशी मी निवडणूक जिंकली : जयकुमार गोरे |
निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा |
पत्नीच्या खून प्रकरणी पतीविरोधात गुन्हा |
दमदाटी प्रकरणी दोन जणांविरोधात तक्रार |
वेगवेगळ्या घटनेत दोन जण बेपत्ता |
अवैधरित्या दारू विक्री केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याचा कराडमध्ये बहुसंख्येने करण्यात आला निषेध |
रामायण, महाभारतातील जीवनमूल्य छत्रपती शिवरायांच्या चरित्रात : गोविंद देवगिरी |
ब्राझीलला असताना त्यांना भुमिपुत्र आठवला नाही का ? : शशिकांत शिंदे |
अर्ज भरला त्याच दिवशी मी निवडणूक जिंकली : जयकुमार गोरे |
निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा |
पत्नीच्या खून प्रकरणी पतीविरोधात गुन्हा |
दमदाटी प्रकरणी दोन जणांविरोधात तक्रार |
वेगवेगळ्या घटनेत दोन जण बेपत्ता |
अवैधरित्या दारू विक्री केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा शहर पोलिसांनी केले 170 गुन्हेगार हद्दपार; 668 सराईतांवर प्रतिबंधक कारवाई |
भाजपने राज्य अस्थिर ठेवण्याचे काम केले : अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर |
बचेंगे तो और भी लढेंगे और जितेंगे भी : नितीन बानुगडे पाटील |
जिल्हाधिकाऱ्यांनी वितरित केले ई-मतदार प्रतिज्ञा प्रमाणपत्र |
अमित दादांसाठी प्रचारक पोहोचले शेताच्या बांधावर |