सातारा मध्यवर्ती बस स्थानकात चोरीचे सोने बाळगल्याप्रकरणी परप्रांतीय महिलांवर गुन्हा दाखल.

by Team Satara Today | published on : 27 January 2026


सातारा : सातारा मध्यवर्ती बस स्थानकात फलाट क्रमांक सात वर दोन महिला संशयास्पद रित्या फिरताना पोलिसांना आढळून आल्या त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्या राजस्थान राज्यातील सुजानगड ता.सिरोई जिल्ह्यातील असल्याचे पोलिसांना सांगितले.यावेळी त्यांच्याकडे ३ लाख रुपये किमतीचे सोन्याची कंठीमाळ आणि ३७ हजार रोख रक्कम आढळून आली. याबाबत त्यांच्या मालकी हक्क बाबत विचारणा केली असता त्यांनी कोणतीही कागदपत्रे सादर न केल्याने हा मुद्देमाल त्यांनी कोठून तरी चोरलेला अथवा लबाडीने मिळवला असल्याची खात्री पोलिसांना पटली. त्यांवरून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२४ प्रमाणे पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत लाड यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार महांगडे करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
प्रजासत्ताक दिनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
पुढील बातमी
शाहूपुरी हद्दीत गणेश कॉलनी येथे महिलेचे मंगळसूत्र लांबवले.

संबंधित बातम्या