उन्हाळ्यात पाणी पिऊनही अनेक वेळा आपले शरीर डिहायड्रेट होते. त्यामुळे थकवा जाणवणे, चक्कर येणे असे त्रास जाणवतात. त्यामुळे उन्हाळ्याला शरीरात हायड्रेट ठेवण्यासाठी फक्त पाणी पिणे पुरेसे नसते. तर उन्हाळ्यात निसर्गाने दिलेली फळे ही शरीराला हायड्रेट करण्यासाठी उत्तम ठरतात. उपयोगी ठरतात. कलिंगड किंवा टरबूज हे फळ उन्हाळ्यात आपले शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी सर्वोत्तम असते.
टरबूजमध्ये ९२ टक्के पाणी असते. त्यामुळे शरीरातील पाण्याची उणीव भरून काढते. त्याच प्रमाणे उन्हामुळे त्वचेची होणारी दाहकता देखील कमी करते.
टरबूज हे हृदयासाठी अत्यंत उत्तम मानले जाते. यामध्ये शरीरात रक्त वाहून नेण्यासाठीचे सिट्रुलीन नावाचे अमिनो आम्ल भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे रक्तदाबावर नियंत्रण राहते. अभ्यासातून असे आढळले आहे की यामधून हृदयविकाराचा धोका कमी करता येतो.
हृदयाप्रमाणेच टरबूज हे त्वचेसाठी देखील सर्वोत्तम असते. यामुळे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. टरबूजमध्ये व्हिटामिन सी भरपूर असते. तसेच उन्हाची दाहकता कमी करून त्वचेची जळजळ देखील कमी होते. टरबूज हे फळ तुमच्या त्वचेची एकप्रकारची सुरक्षा छत्रीच आहे.
तुम्हाला जर संधिवात असेल तर टरबूज खाणे फायदेशीर ठरते कारण नियमित टरबूज खाल्ल्याने संधीवाताचा त्रास कमी होत जातो.
टरबूजातून व्हिटामिन ए ९ ते ११ टक्के इतक्या प्रमाणात मिळते. त्यामुळे ते डोळ्यांसाठी आरोग्यदायी असते.
खूप थकवा जाणवत असेल तर टरबूजचा रस किंवा ज्यूस प्यावा. यामुळे शरीर पुन्हा हायड्रेट होते आणि थकवा दूर होतो.