सुनील वाघमळे यांना बालगंधर्व स्मृती पुरस्कार

by Team Satara Today | published on : 26 December 2024


सातारा : कण्हेर (गणेशनगर),ता. सातारा येथील सुनील बाबुराव वाघमळे यांना बालगंधर्व स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे.

संगीत क्षेत्रातील अनुभव वयाच्या १० व्या वर्षापासून सुनील वाघमळे यांना आहे. त्यांनी  मृदुंग व तबला याचे शिक्षण गुरुवर्य कै. गणपत बुवा घागरे (जोतिबाचीवाडी) यांचेकडे घेतले होते. पुढे मदन कदम व शाम सुतार यांचे मार्गदर्शन मिळाले. वारकरी सांप्रदाय तालुका सातारा व जावली या विभागामध्ये अनेक कीर्तन व भजन यांना साथ संगत दिली. तसेच अनेक नाटक व एकांकिका यांना संगीत संयोजन महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळामध्ये पुरस्कार निवड समिती मध्ये ३ वर्ष सदस्य म्हणून काम पाहिले आहे. दूरचित्रवाणी व आकाशवाणीवर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाला साथ संगत देत आहेत.याबद्धल वाघमळे यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
तृतीय ‘महाराष्ट्र्र मंदिर न्यास परिषदे’त ८७५ हून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती!
पुढील बातमी
भीमाशंकरमध्ये नाताळ सुट्टीनिमित्त २ लाख भाविकांनी घेतले शिवलिंगाचे दर्शन

संबंधित बातम्या