नववर्षाच्या पहाटेच काळाचा घाला ! कोल्हापुरात भरधाव कारने तिघा जणांना चिरडले

by Team Satara Today | published on : 01 January 2026


कोल्हापूर : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आज (दि.१ जानेवारी) पहाटेच्या सुमारास एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. तावडे हॉटेल परिसरात भरधाव वेगाने आलेल्या एका इनोवा कारने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या तिघांना भीषण धडक दिली. या भीषण अपघातात तिन्ही व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला असून, कोल्हापूर शहरात या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज गुरूवारी (दि.१ जानेवारी) पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली. थंडीचा कडाका असल्याने तावडे हॉटेल चौकात रस्त्याच्या कडेला काही लोक शेकोटी पेटवून उब घेत उभे होते. याच दरम्यान, महामार्गावरून अतिवेगात येणाऱ्या एका इनोवा कारने या तिघांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, तिघांचाही जागीच अंत झाला. घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून तिन्ही मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयात पाठवले आहेत. मृतांची ओळख अद्याप पटली नसून सध्या पोलीस मृतांची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर करत आहेत. संबंधित कार चालकावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे आता 24 तास खुले! नागरिकांच्या हक्कांसाठी ऐतिहासिक पाऊल; मध्यरात्रीही मिळणार न्याय
पुढील बातमी
नव्या वर्षाच्या प्रारंभीच लाडक्या बहिणींच्या जखमेवर चोळले मीठ ; दीड हजार रुपयांचा हप्ता जमा होण्यास प्रारंभ ; महिलांमध्ये तीव्र असंतोष

संबंधित बातम्या