11:31pm | Sep 19, 2024 |
सातारा : शिवसेना उबाठा गटाच्या शिवसैनिकांनी गुरुवारी सातार्याच्या पूर्व भागातील खंडित पाणी पुरवठ्याच्या विरोधात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात धरणे आंदोलन केले. जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी प्राधिकरणाने पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला. यानंतर प्राधिकरण व्यवस्थापनाच्या सूत्रांनी शिवसैनिकांना पाणी पुरवठा त्वरित सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन दिले.
गेले आठ दिवस शाहूनगर सातारा येथील पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे. यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले होते. विद्यमान लोकप्रतिनिधी यांचे संपूर्ण दुर्लक्ष या प्रकरणी होते. याच वेळी शिवसेना उबाठा गटाचे सातारा शहर प्रमुख शिवराज टोणपे यांनी हा विषय जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांच्या कानावर घातला. सर्व पदाधिकारी यांच्या सोबत जिल्हा प्रमुख पाणी पुरवठा कार्यालयात पोहचले असता त्या ठिकाणी एकही अधिकारी उपस्थित नव्हते. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली. अखेर लिखित स्वरूपात अधिकारी यांनी काही तासात पाणी पुरवठा सुरळीत करू, असे लिहून दिले. त्याप्रमाणे कार्यवाही झाली नाही तर शिवसेनेच्यावतीने कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला.
यावेळी तालुका प्रमुख सागर रायते, सुनील पवार, प्रणव सावंत, रवींद्र भणगे, हरी पवार, इम्रान बागवान, आरिफ शेख, अमोल गोसावी, रवींद्र पोळ, परवेझ शेख, अजय सावंत, राहुल मोहिते आदी पदाधिकारी उपस्थित होते. शाहूनगर वासियांनी याबाबत शिवसेना पदाधिकारी यांचे आभार मानले.
परळीतील घरफोडीच्या गुन्ह्याची केवळ बारा तासात उकल |
शाहूनगर येथे सुमारे लाखाची घरफोडी |
अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर पोक्सो दाखल |
कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांची होणार जगप्रसिद्ध कंदी पेढ्याने तुला |
आदित्यची तळमावले, साईकडेत मिरवणूक |
कराडात सोळा लाखांची ऑनलाईन फसवणूक |
कोरेगांव तालुक्यात कुणबी-मराठा आढळलेल्या नोंदीची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध |
गव्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू |
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
कराडात सोळा लाखांची ऑनलाईन फसवणूक |
कोरेगांव तालुक्यात कुणबी-मराठा आढळलेल्या नोंदीची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध |
गव्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू |
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |