साताऱ्यात युवकास मारहाणप्रकरणी तरडगावच्या तीन जणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 19 July 2026


सातारा : दोन जणांना मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 17 रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास यश सचिन शिंदे (सध्या रा. गणेश बिल्डिंग, सदर बझार, सातारा) याच्यासह त्याच्या मित्रास एका मुलीशी का बोलतो, या कारणावरून मंथन परमेश्वर शिंदे (रा. तरडगाव, ता. फलटण) व त्याच्यासोबतच्या इतर अनोळखी दोन जणांनी पट्ट्याने व दगडाने मारहाण केली आहे. याबाबत संबंधितांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार देशमुख करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात खणआळीत सार्वजनिक ठिकाणी संशयास्पद साहित्य ; चौकशीची मागणी, सीसीटीव्ही तपास सुरू
पुढील बातमी
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा

संबंधित बातम्या