सातारा : उन्हाने अंगाची काहिली झाली आहे. यामुळे झाडाच्या सावलीखाली मेंढ्यांना एकत्र केले. याचवेळी जवळच असलेल्या विहीरीतील पाणी पिण्यासाठी बापलेक गेले. याच दरम्यान, परत येईपर्यंत अचानकपणे येथील मेंढ्या भुकेने व्याकुळ असल्यामुळे जवळ असणाऱ्या विषारी हिवारच्या शेंगा खाल्ल्याने काही वेळातच २४ मेंढ्याचा पोट फुगून मृृ्त्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान घडली. यामध्ये साडेसात लाख रुपयांचे नुकसान झाले. शासनाकडून तत्काळ मदत मिळावी, अशी अपेक्षा मेंढपाळ नाना रामदास सुळ यांनी व्यक्त केली.याबाबतची अधिक माहिती अशी, फलटण तालुक्यातील आदर्की बुद्रुक येथील मेंढपाळ नाना रामदास सुळ यांचा मेंढपाळाचा व्यवसाय आहे. मागील चार पाच वर्षात घरच्या आर्थिक स्थितीतचा अर्थकारणाचा ताळमेळ लावताना मेंढ्या विकाव्या लागल्या. आता पाच वर्षानंतर यावर्षी पुन्हा नव्याने तीस ते पस्तीस मेंढ्या घेतल्या. एक मेंढी साधारणपणे ३0 ते ३५ हजार रुपये आहे. आता उपजिवीकेसाठी या मेंढ्यांच्या माध्यमातून आपल अर्थकारण सावरेल, या आशेवर नाना व त्याचे वडील मेंढ्याचा सांभाळ करताना दररोज या गावावरुन त्या गावाला जाणे असे नित्यक्रम राहिला. सोमवार, दि. २८ एप्रिल रोजी यापैकी २४ मेंढ्यांचा मृत्यू झाल्याने आता जगावे की मरावे, असंच प्रश्न त्याच्यापुढे राहिला आहे. आता शासनाने त्याच घरटं सावरण्यासाठी आर्थिक पाठबळ द्यावे, अशी अपेक्षा सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे.आदर्की बुद्रुक येथील मेंढपाळ नाना रामदास सुळ हा युवक मेंढ्या चारण्यासाठी सातारा तालुक्यातील कोंडवे गावात आला आहे. त्यांचा तेथे तळ आहे. ते आपल्या मेंढ्या घेऊन जाण्यासाठी आव्हाडवाडी, निकमवाडी या गावच्या शिवारातून सोमवारी दिवसभर चरण्यासाठी गेले होते. दरम्यान, निकमवाडी येथे सोमवारी सायंकाळी ५ वाजता बापलेक एका विहीरीत पाणी पिण्यासाठी गेले. त्याचवेळी मेंढ्यांना हिवराच्या झाडाच्या शेंगा दिसल्याने मेंढ्या पळत त्या झाडाखाली गेल्या. मेंढ्यांना आडवेपर्यंत त्यांनी शेंगा खाल्ल्या, शेंगा खाल्ल्याने मेंढ्याचा मृत्यू पोट फुगून झाला. या घटनेने मेंढपाळ नाना सुळ हे पुरते हतबल झाले आहेत. शासनाकडून मदत मिळावी, अशी अपेक्षा नाना सुळ यांनी व्यक्त केली आहे.
पशुसंवर्धनकडून मदतीचे आश्वासन
हिवराच्या शेंगा खाल्याने २४ मेंढ्यांचा सातारा तालुक्यातील निकमवाडी येथे मृत्यू झाला. या मेंढपाळाच घरट सावरण्यासाठी घटना समजताच तत्काळ सातारा जि.प.चे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार पोहोचले. त्यानंतर त्यांनी या घटनेचा पंचनामा करण्याबाबत संबंधितांना सूचना केल्या. महसुल विभागाच्या माध्यमातून या मेंढपाळास मदत मिळण्याबाबत प्रस्ताव तयार करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर झेडपीच्या माध्यमातुनही या मेंढपाळास आपल्या उपजिवीकेसाठी पुन्हा उभारी घेता यावी, यासाठी मदत केली जाणार आहे.
- डॉ. विनोद पवार,
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी सातारा.
मागील बातमी
रुग्णांना आपल्या हक्काची सनद माहिती असावी : उमेश चव्हाण
पुढील बातमी
सातारा जिल्हा पोलीस दलातील ९ जणांना पोलीस महासंचालक पदक जाहीर