सातारा : मायणी मेडीकल कॉलेज प्रकरणात फसवणूकीचा दाखल असलेल्या सातारा आर्थिक गुन्हे शाखेत हजेरीसाठी आलेल्या दीपक देशमुख यांना अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने अटक केली. बुधवारी दुपारी सातार्यात एलसीबी व आर्थिक गुन्हे शाखेत फिल्डींग लावून ईडीने ही कारवाई केली.
याबाबत अधिक माहिती अशी, मायणी मेडीकल कॉलेज अपहार प्रकरणातून गुन्ह्यांची मालिका दाखल झालेली आहे. वडूज पोलिस ठाणे तेथून सातारा आर्थिक गुन्हे शाखा व पुढे ईडीपर्यंत यातील गुन्हे वर्ग झालेले आहेत. दीपक देशमुख यांच्यावर मायणी मेडीकल कॉलेज प्रकरणातून २०२३ साली फसवणूकीचा गुन्हा दाखल असून त्याचा तपास सातारा आर्थिक गुन्हे शाखेतील सपोनि शिवाजी भोसले करत आहे. दीपक देशमुख यांना संबंधित गुन्ह्यात उच्च न्यायालयात जामीन मिळाला आहे. सातारा आर्थिक गुन्हे शाखेत तपासासाठी हजर राहण्यासह त्यांना अटी व शर्थीवर हा जामीन मिळाला आहे. दुसरीकडे दाखल एका अन्य गुन्ह्यात ईडी दीपक देशमुख यांच्या शोधात होती.
दीपक देशमुख हे सातार्यात आर्थिक गुन्हे शाखेत हजेरीसाठी जात असल्याची माहिती ईडीला मिळाली. दि. २७ ऑगस्ट रोजी त्यांनी हजेरी लावली होती. तसेच ४ सप्टेबर रोजीही हजेरी होती. या प्रकरणात दीपक देशमुख सकाळी आर्थिक गुन्हे शाखेत आले. तपासासाठी शाखेत गेल्यानंतर दोन मिनिटांमध्ये ईडीचे पथक त्यांच्यासमोर जावून थांबले. 'हम ईडी विभाग से हैं,' असे म्हणत त्यांचा ताबा घेत असल्याचे सांगितले. त्यानंतर दीपक देशमुख यांनी शांतपणे त्यांना सहकार्य करत असल्याचे सांगितले. सुमारे दीड तास तेथेच चौकशी केल्यानंतर ईडीचे पथक त्यांना तेथून घेवून गेले.
अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
एकजण बेपत्ता |
गळफास घेवून युवकाची आत्महत्या |
संविधानाचा आधुनिक राष्ट्र निर्मितीचा संकल्प साकारण्याचे आव्हान : अन्वर राजन |
सातारा एसटी स्टँड परिसरातील बंद टपऱ्या हटवल्या |
जिल्ह्यात कॅबिनेट मंत्रीपदाचा मान कोणाकोणाला ? |
सहकारातील प्रतिकूल परिस्थितीतही गॅलेक्सीने निर्धाराने टाकलेले एकेक पाऊल यशस्वी झाले : रामभाऊ लेंभे |
ग्राहकांनी पाणी देयके 15 डिसेंबरपर्यंत भरावीत |
खा. उदयनराजेंच्या एका फोनने वाचला तरुणाचा जीव |
जनता सहकारी बँक साताराच्यावतीने रविवारी कार्यशाळा, प्रशिक्षण |
जनतेने एक विकासाभिमुख नेतृत्व विधान सभेमध्ये पाठवले : प्रा. दशरथ सगरे |
कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी समोर आत्मक्लेश आंदोलन |
चंद्रशेखर गावस, राजीव मुळ्ये यांना गुंफण पुरस्कार जाहीर |
ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील थंडी गायब |

दिव्यांग-अव्यंग व्यक्तींना विवाहास प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन |
फळबागांच्या उत्पादन वाढीसाठी पाडेगाव फार्म येथे खत व्यवस्थापन प्रात्यक्षिक |
पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
वृद्ध महिलेच्या फसवणूक प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |