कराड : सध्या महाराष्ट्रात सर्वजनिक गणेशोत्सव मोठया प्रमाणात उत्साहाने साजरा होत आहे. कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील सार्वजनिक सण, उत्सवा दरम्यान गोंधळ करुन कायदा व सुव्यवस्था निर्माण करणाऱ्या तसेच पोलीस अभिलेखावरील गुन्हे असलेले संशयित आरोपी यांचे गणेशात्सवा दरम्यान कराड पोलीस ठाणे हद्दीत येणेस मज्जाव करणेकरीता उपविभागीय दंडाधिकारी कराड विभाग कराड यांचेकडे प्रस्ताव सादर करणेत आले होते. या प्रस्तावास मंजुरी मिळाली असून तब्बल 92 जणांना पोलिसांवर हद्दपार करण्यात आले आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत व कायदा व सुव्यवस्थेत पार पाडणेसाठी कराड शहर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार यांनी रेकॉर्डवरील लोकांचे अभिलेख पडताळुन त्यांचेवर गणेशोत्सवात योग्य व कडक प्रतिबंधक कारवाई होणेसाठी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविले होते. गुन्हेगारी क्षेत्रातील माहीर आरोपीतांवर बीएनएनएस कलम 163 (२) प्रमाणे पाठविले प्रस्तावांची चौकशी होवुन उपविभागीय दंडाधिकारी कराड विभाग कराड यांनी गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेल्या आरोपींना गणेशेत्सवाचे अंतिम चरणामध्ये कराड शहर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रामध्ये प्रवेश व वास्तव्यबंदी केलेली आहे. याबाबतचे आदेश दि. 13. सप्टेंबर रोजी प्राप्त झाल्यानंतर त्या आदेशांची कराड शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड यांचे पथकाने बजावणी संबंधीतांना करुन 92 जणांना कराड शहर पोलीस ठाण्याची हद्द सोडण्याचे फर्मान काढले आहे. तसेच बीएनएनएस कलम 168 प्रमाणे 307, बीएनएनएस कलम 126 प्रमाणे 50, बीएनएनएस कलम 128 प्रमाणे 28, बीएनएनएस कलम 129 प्रमाणे 05, प्रोव्ही 93 प्रमाणे 10 प्रमाणे महाराष्ट्रात पोलीस अधिनियम कलम 142 प्रमाणे 02 जणावर सार्वजनिक गणेशोत्सव अनुषंगाने प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.
हद्दपार करण्यात आलेल्या इसमांनी हदृपार कालावधीमध्ये उपविभागीय दंडाधिकारी कराड विभाग कराड अथवा कराड शहर पोलीस ठाणेचे प्रभारी वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांचे परवानगीशिवाय प्रवेश करु नये. हद्दपार इसमाने विनापरवाना कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत प्रवेश केल्यास किंवा हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्यास अशा हदृपार व्यक्तींवर कराड शहर पोलीस ठाण्याकडुन प्रचलीत कायदयान्वये कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने एकाचा मृत्यू |
जीवन प्राधिकरण कर्मचार्यांचे वेतन आयोगासाठी आंदोलन |
कॉंग्रेस पक्ष वाढीसह विधानसभेला हवे सुक्ष्म नियोजन |
वंचित आघाडीच्या वतीने 58 उमेदवारांच्या मुलाखती |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
झेडपीच्या आरोग्य विभागात 243 जणांना नियुक्ती |
उद्या शासकीय विश्रामगृहामध्ये होणार 'वंचित' च्या मुलाखती |
राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन |
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात |
खोटं बोलणार्या कॉंग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी |