सातारा : हॉटेलमधून अज्ञात चोरट्याने 17 हजारांच्या मुद्देमालाची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अज्ञात चोरट्याने हॉटेलमधून रोख 14 हजार रुपये व मोबाईल 3 हजार रुपये किंमतीचा असा एकूण 17 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना दि. 29 डिसेंबर रोजी घडली असून अझरुद्दीन मुसा नालबंद (रा.रविवार पेठ) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.