चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा मानसिक छळ; पतीविरुद्ध गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 19 March 2026


सातारा : कारंजकर नगर गोडोली येथे राहणाऱ्या ३८ वर्षीय पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी पती नागेश शंकर पवार (वय ४३, रा. कारंजकर नगर गोडोली सातारा) याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात जाचहाटसह दुखापत केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना १३ मार्च २००७ पासून २७ फेब्रुवारी २०२६ च्या दरम्यान वारंवार घडली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पत्नीने दिलेल्या फिर्यादीत नागेश यांचा खतांचा व्यवसाय आहे. दि १८ रोजी तो दारू पिऊन घरी आला. यावेळी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ व मारहाण करू लागला. तू माझ्या घरात राहू नकोस, तू घरातून निघून जा, मला तुझी गरज नाही. तुझे इतर पुरुषांबरोबर संबंध आहेत असे म्हणत माझ्याकडे 'गन' आहे तुला मारून टाकीन, अशी धमकी दिली. याप्रकरणी पत्नीने सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद पती विरोधात फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कदम करत आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा तहसील कार्यालय परिसरात चेन स्नॅचिंग; ९० हजाराचे मंगळसूत्र लंपास
पुढील बातमी
घरफोडीच्या तयारीत असलेली टोळी तालुका पोलिसांनी केली जेरबंद

संबंधित बातम्या