सातारा : दहिवडी तालुका माण गावाच्या हद्दीतील गोंदवले रस्त्यावर जातीवाचक शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी दहिवडी येथील तिघांवर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. किशोर सत्यवान लोखंडे आणि त्यांचे चुलत भाऊ किरण लोखंडे हे मारहाणीत जखमी झाले आहेत
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी किशोर लोखंडे वय 25 राहणार म्हसवड मल्हारनगर तालुका माण यांनी फिर्यादी दिली आहे. अक्षय सकुंडे वय 28, संजय श्रीमंत सकुंडे वैद्य वय30, प्रथमेश शिवाजी जाधव वय 33, सर्व राहणार दहिवडी या संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊच्या दरम्यान घडलेला आहे.
किरण लोखंडे, किशोर लोखंडे आणि त्यांचा मित्र स्वप्नील भोकरे हे गोंदवले मार्गावर मोटरसायकल उभे करून थांबले असता वखारीचे जळण परस्पर विकल्याच्या कारणावरून संबंधित तिघांनी लोखंडे यांना जातीवाचक शिवीगाळ करून लाकडी दांडके लोखंडे यांना मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी सह दोघे जखमी झाले आहेत. पोलीस हवालदार बोडरे अधिक तपास करत आहेत.