सातारा : विनयभंग केल्याप्रकरणी आकाशवाणी झोपडपट्टी येथील पप्या संजय बंडगर, लाला सुरेश घाडगे या दोघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार दि. २३ रोजी घडला. सहायक फौजदार कदम तपास करत आहेत.
दुसऱ्या घटनेत ३० वर्षीय महिलेला घरात एकटी असताना मनास लज्जा उत्पन्न होईल अशी कृती केल्याने रोहन विकास घाडगे, त्याची आई, पत्नी (दोघींची नावे माहिती नाहीत, रा. आकाशवाणी झोपडपट्टी) यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हवालदार डमकले तपास करत आहेत.