सातारा : दुचाकीच्या डिकीतून अज्ञात चोरट्याने 3 लाख रुपयांसह महत्त्वाची कागदपत्रे लंपास केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातार्यातील पोस्ट आफिसमधून 3 लाख रुपयांची रक्कम काढल्यानंतर ती दुचाकीची डिकीत ठेवली. रिमांड होममध्ये काम असल्याने वकील महिला आतून बाहेर येईपर्यंत अवघ्या 40 मिनिटांमध्ये चोरट्यांनी 3 लाखांची रोकड लंपास केली. वैशाली मंगेश जाधव (वय 43, रा. रामनगर ता.सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 17 जुलै रोजी दुपारी घडली आहे. पैसे, बँकेचे पासबुक, चेकबुक, वकीलपत्राच्या प्रती अशी कागदपत्रे चोरी झाली आहेत. या सर्व घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटोळे करीत आहेत.