सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील महादेवी हत्तीणीची गुजरातमधील वनताराकडे रवानगी करण्यात आल्यानंतर एकच जनआक्रोश सुरू आहे. अनेक राजकारणी मंडळी माधुरीला पार्ट आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अनेक नागरिकांनी जिओला बॅन केले आहे. आपले सिमकार्ड दुसऱ्या कंपनीत पोर्ट करून घेतले आहे. दरम्यान या प्रकरणाची दखल मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली आहे. त्यांनी या घटनेवर भाष्य केले आहे.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात हत्तीणीसाठी आक्रोश सुरु झाल्यानंतर आणि मोठ्या प्रमाणात जिओ पोर्ट करण्याची मोहीम सुरु झाल्यानंतर वनताराचे सीईओ कोल्हापुरात पोहोचले. यावेळी त्यांची पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह मठाधिपती यांच्याशी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा झाली. महादेवी हत्तीणीसाठी न्यायालयीन लढाई लढावी लागणार असून सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणं गरजेचं आहे. त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
हा काही शासन निर्णय नाहीये. या संदर्भात काहीं तक्रारी दाखल झाल्या होत्या, त्याबाबत मुंबई हायकोर्टात एक याचिका दाखल झाली. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे हत्ती संवर्धन नसल्याने तिला अन्यत्र हलवण्यात यावे अशा समितीच्या अहवालावर हायकोर्टाने हा निणर्य दिला आणि सर्वोच्च न्यायालयाने देखील तो कायम ठेवला आहे. त्या हत्तीणीला वनतारामध्ये ठेवावे, असे सुप्रीम कोर्टाने सांगितले. हा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. यामध्ये शासनाची थेट कोणीतही भूमिका नाही.
समाजामध्ये एक रोष आहे. विशेष करून जे भाविक आहेत त्यांच्या मनामध्ये एक भावना आहे. आम्ही त्या हत्तीणीची पूजा करायचो त्यामुळे ती आम्हाला आमच्या परिसरात अथवा नांदणी मठात च तिचे अस्तित्व हवे आहे. काही आमदार आणि खासदारांनी माझ्याशी याबाबत चर्चा केली. मी मंगळवारी याबाबत बैठक लावलेली आहे. या बैठकीत कायदेशीर पर्याय आहेत? कारण आपल्यला माहिती आहे की, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या वर आपण नाही. त्यामुळे कोणत्या कायदेशीर तरतुदी आहेत? कशाप्रकारे हत्तीणीला परत आणता येईल किंवा कशाप्रकारे तिची व्यवस्था करता येईल यावर या बैठकीत चर्चा करू.