सातारा : म्हसवे परिसरात गस्त घालत असताना पोलिसांनी संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका युवकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून घरफोडीसाठी वापरली जाणारी साधने जप्त करण्यात आली आहेत.
सर्व्हिस रोड परिसरात कारवाईदरम्यान युवकाकडे स्क्रूड्रायव्हर आणि लोखंडी छन्नी आढळून आली. पोलिसांच्या फिर्यादीवरून हर्षल कांताराम आंबेकर (रा. म्हसवे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार माने करीत आहेत.