सोनगाव कचरा डेपोसमोर कारची दुचाकीला धडक; दुचाकीचालक जखमी

by Team Satara Today | published on : 18 October 2025


सातारा :  सोनगाव, ता. सातारा येथील नगरपालिकेच्या कचरा डेपोसमोरील बोगदा ते शेंद्रे रस्त्यावर मारुती कारची (एमएच ४३ एएन ०९५२) दुचाकीस धडक बसली. यात दुचाकीचालक जखमी झाले आहेत. अपघातानंतर कारचालक तेथून पळून गेला. दि. १६ रोजी ही घटना घडली. 

दुचाकीस्वार सयाजी सोपान निकम (वय ४८, रा. व्यंकटपुरा, सातारा, मूळ रा. चिंचणी- डिस्कळ, ता. खटाव) यांनी फिर्याद दिली असून, कारचालक विशाल वसंत कुंभार (वय २५, रा. पेरले, ता. कराड) याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस हवालदार वायंदडे तपास करत आहेत. 




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले व आमदार मनोज घोरपडे यांची पंचपाळे दुर्गा माता मंदिरा सदिच्छा भेट
पुढील बातमी
दहशत माजवल्याप्रकरणी साताऱ्यातील आठ जणांवर गुन्हा; शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

संबंधित बातम्या