पाणीप्रश्न कायमचा मिटवण्यात यावा

by Team Satara Today | published on : 06 March 2025


महाबळेश्वर : महाबळेश्वरचा पाणीप्रश्न कायमचा मिटवावा. प्राधिकरणाकडून महाबळेश्वरकरांना महागड्या दराने पाणी दिले जाते त्याचे दर कमी करावे. अन्यायकारक घरपट्टी कमी करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी महाबळेश्वर नागरिकांच्यावतीने शिष्टमंडळाने मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्याकडे करण्यात आली. त्यावर मुख्याधिकार्‍यांनी यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. 

प्राधिकरणाकडून पाणी विकत घेवून पालिकेला कमी दराने नागरिकांना द्यावे लागत आहे. त्यामुळेच पालिकेची थकबाकी 15 कोटींवर गेली आहे. त्यावर प्राधिकरणाकडून व्याज आकारणी होत गेल्याने रक्कम वाढत गेली आहे. त्यामुळे प्राधिकरणाकडून वारंवार पाणीपुरवठा खंडीत करण्याचा इशारा दिला जातो. यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे. प्राधिकरणाकडून दिले जाणारे पाणी महागड्या दराने दिले जात असून ते दर कमी करणे गरजेचे आहे. महाबळेश्वरवासियांना 6 रूपये प्रतिलिटर प्रमाणे पाणीपट्टी आकारावी. अभय योजनेतून थकबाकीवरील व्याज माफीसाठी प्रस्ताव करावा. धरण व पाणी पुरवठा यंत्रणेची मालकी पालिकेने स्वत:कडे ठेवावी, अशा मागण्या शिष्टमंडळाने मुख्याधिकार्‍यांकडे केल्या. यावर योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्याधिकार्‍यांनी दिली.

यावेळी राजेश कुंभारदरे, संतोषआबा शिंदे, सुरेश साळुंखे, राजाभाऊ गुजर, जावेद वलगे, रमाकांत शिदे, संजय कदम, अशोक शिंदे, शंकर ढेबे, शाहनवाज खारकंडे, राजेंद्र बोधले व नागरिक उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पंतप्रधान इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
पुढील बातमी
मुख्यमंत्री रोजगार प्रशिक्षण विभाग सुरू करा

संबंधित बातम्या