शाहूनगरीत उद्या बाप्पांचे होणार स्वागत

सातारा पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून विसर्जन तळ्याच्या कामाची पाहणी

by Team Satara Today | published on : 26 August 2025


सातारा : विघ्नहर्त्याचे, आपल्या लाडक्या बाप्पांच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु केली असून सर्व विघ्ने बाप्पांच्या आगमनामुळे निघून जातील, यासाठी बाप्पांच्या आगमनाकडे सगळ्याच्या नजरा असून बाप्पाचे बुधवारी शाहूनगरीत जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. दरम्यान, हरतालिकेची उपवास व पूजा मोठ्या उत्साहात पार पडली. दरम्यान, सातारा शहरात बाप्पांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांची तयारी सुरु होती. बाजारपेठेत अलोट गर्दी असून वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. पालिकेकडून कृत्रीम तळ्याच्या कामाची पाहणी सुरु होती.

विघ्नहर्ता, सुखकर्ता लाडका बाप्पा लवकर येणार म्हणून सातारकरांची तयारी गेली महिनाभर सुरु आहे. आगमन मिरवणूका काढण्यात तसेच आरास करण्याची लगबग मंडळाच्या कार्यकर्त्यांची भक्तांची लगबग पहायला मिळत होती. गणेश भक्तांनी वेगवेगळया स्टॉलवर कुंभारवाड्यात खरेदी केलेल्या गणेश मुर्ती मुहूर्तावर आणण्यासाठी नियोजन केले असून मुहूर्त कधीचा आहे. मुहूर्तावर आपल्या लाडक्या बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यासाठी सातारा शहरात गणेश भक्तांकडून तयारी सुरु आहे. त्याचबरोबर गणेशोत्सव मंडळांकडूनही नियोजन करण्यात आलेले आहे. मंगळवारी शहरातील बाजारपेठेत रेकॉर्ड ब्रेक गर्दी पहायला मिळत होती. बाजारात बाप्पांच्या स्वागतासाठी लागणारी रांगोळी, हार, फुले यासह सर्व साहित्य खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली होती.

सातारा शहरातील वाहतूकीत बदल

गणेशोत्सवाच्या पार्श्वभीमुवर सातारा शहरात वाहतूकीत बदल करण्यात आला असून वाहतूक कोंडी होवू नये तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दि. 26 च्या सकाळी 10 पासून ते दि. 27 च्या रात्री 10 पर्यंत हा बदल करण्यात आला आहे. त्यामध्ये शहरात ज्या दिशेस गणपती मंडळे आहेत. त्याच दिशेस दि. 26 ते दि. 6 सप्टेंबर पर्यंत पार्किंगची व्यवस्था करावी, शहरात येणारी अवजड वाहने ही सकाळी 6 ते 10 पर्यत येतील, अन्य वेळेत येणाऱ्या वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. राजपथ, शाहु चौक, समर्थ मंदिर, मोती चौक ते शिवतीर्थ रस्त्यालगत असणारी बेवारस वाहने ही पर्यायी पार्किगमध्ये लावावीत, खरेदीसाठी चार चाकी वाहन घेवून येणाऱ्या नागरिकांनी आपले वाहन सातारा तालिम संघ तसेच आळूचा खड्डा येथे पार्किंग करावे, अशा सुचना पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिल्या आहेत.

सातारा नगरपालिकेकडून विसर्जन तळ्याच्या तयारीची पाहणी

सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्यासह अभियंता दिलीप चिद्रे व इतर अधिकाऱ्यांनी गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरात कृत्रिम तळयांची तयारी सुरु आहे. त्याची पाहणी केली. त्या तळ्यात पाणी सोडण्यात येत आहे. तळी भरुन घेण्यात येत आहे. प्रामुख्याने गोडोली येथील कल्याणी शाळेच्या शेजारी, सदरबाजारात दगडी शाळेच्या पाठीमागे, हुतात्मा स्मारक परिसरात, राजवाडा पोहणे तलाव, बुधवार नाका येथे विसर्जन तळयाची सुविधा केली असून उपनगरात कृत्रिम टाक्यात ठेवण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
हृदयरोग आणि उच्च रक्तदाब यांच्यातील संबंध
पुढील बातमी
सातारा जिल्हा परिषदेचा गौरव

संबंधित बातम्या