सातारा : सातारा तालुक्यातील बसप्पाचीवाडी येथे शेजारील वाद मिटविण्यासाठी गेलेल्या कुटुंबातील सदस्यांवर दगड व विटेने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पुनम अनिल राणे या आपल्या कुटुंबासह गैरसमज दूर करण्यासाठी सचिन शिंदे यांच्या घरासमोर गेल्या होत्या. यावेळी झालेल्या वादातून शिवीगाळ आणि दमदाटी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. वाद वाढल्यानंतर दगडफेक आणि मारहाण झाल्याने सिद्धेश राणे याच्या डोक्याला दुखापत झाली. तसेच कुटुंबातील इतर सदस्यांनाही मारहाण झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी सचिन बळवंत शिंदे आणि शैला सचिन शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार गोरे तपास करीत आहेत.