पिकअप गाडीची दुचाकीस धडक
by Team Satara Today | published on : 10 May 2025

सातारा : कोल्हापूर ते पुणे जाणाऱ्या महामार्गावर वाढेफाटा पुलाच्या उतारावर राजधानी हॉटेलच्या समोर पिकअप गाडीची (केए २३ ए ०३३८) दुचाकीला (एमएच ११ सीएन ५९२) पाठीमागून धडक बसली. यात दुचाकीस्वार प्रणव रमेश गोरे (वय २९, रा. बेलमाची, पो. किकली, ता. वाई) जखमी झाला. दि. ५ रोजी अपघात घडला. या प्रकरणी पिकअप गाडीच्या चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात प्रणव रमेश गोरे याने गुन्हा दाखल केला आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा