सातारा : सातारा शहरात गोडोली नाका रस्त्यावर आणि अजंठा चौक येथे रस्त्यावर मद्यपींनी गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अमित शिवाजी बाबर (वय ३०, रा. बाबर कॉलनी,करंजे) व राजेश शंकर शिंदे (वय ४७, रा. बाबर कॉलनी,करंजे) यांनी सार्वजनिक रस्त्यावर दारूच्या नशेत गैरशिस्तीने गोंधळ घालत असताना पोलिसांना आढळून आले,सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांततेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अधिक तपास पोलीस हवालदार जाधव आणि यादव करत आहेत.